दुर्दैवी ! शाळेत चाललेल्या मुलांवर उसाची ट्रॉली उलटून दोघांचा मृत्यू , आंबेगाव तालुक्यातील घटना…!
मंचर : आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या शिरोली सुलतानपूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचा आणखी एक मित्र गंभीर जाक्मी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. २१) सकळी उघडकीस आला आहे. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुणाल मच्छिंद्र भोर (वय १६), ओम दत्तात्रय भोर (वय-१६ रा. दोघेही रांजणी, ता. आंबेगाव) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर पार्थ सुदर्शन भोर (१७, सर्व रा. रांजणी, ता. आंबेगाव) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अशोक भोर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल भोर, ओम भोर व पार्थ हे तिघेजण मित्र होते. हे तिघेजण ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी घेऊन चालले होते. त्यावेळी कुणाल मच्छिंद्र भोर हा ट्रॅक्टर चालवत असताना अचानक ट्रॅक्टरवरील त्याचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटूनन अपघात झाला.
दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टर खाली येऊन कुणाल मच्छिंद्र भोर व ओम दत्तात्रय भोर हे दोघेजण जागीच ठार झाले तर पार्थ सुदर्शन भोर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास मंचर पोलिस करत आहे.