दिवे घाटात टॅंकरचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सासवड व बारामती येथील दोघांचा जागीच मृत्यू…


हडपसर : सासवड -हडपसर  पालखी  मार्गावरील दिवे घाटात एका टँकरचे नियंत्रण सुटून तो टॅंकर दोन ते तीन वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. झालेल्या अपघातात बारामती व सासवड येथील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पांडुरंग शिंदे (वय. ५६, रा. सोमेश्वरनगर, बारामती), धनंजय पवार (वय. ३८, भिवडी ता.पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टँकर हा सासवड मार्गावरून पुण्याकडे निघाला असताना दुचाकीला जोरदार धडक दिली. तसेच टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने टॅंकर सुमारे दोनशे ते तीनशे फूट दरीत कोसळला.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले होते.  तर  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!