‘इंदापूर ‘ला दोन पवार गट भिडले! विकासकामांच्या श्रेयवादावरुन झुंपली..!!
पुणे : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत तुफान राडा झाला आहे. इंदापूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आज होणार होते. दरम्यान भुमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्याने शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये उद्घाटनावरुन तुफान राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा वाद इंदापुरात पाहायला मिळाला.
नेमकं काय घडलं?
इंदापूरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानाच्या उद्धघाटनाच्या कोनशिलेवरती खा. सुप्रिया सुळे याच नाव टाकलं नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याच वेळी अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे भूमिपूजनाच्या ठिकाणी दाखल झाले. आणि जोरदार घोषणाबाजी करून तुफान राडा झाला. पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आमदार दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये झालेल्या वादाबाबत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव घाई गडबडीत कोनशिलेवर लिहायचे राहिले आहे. ते आगामी काळात दुरुस्त करण्यात येईल, असे आमदार भरणे यांनी स्पष्ट केले.