ट्रक चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना लोणीकाळभोर पोलिसांकडून दोन तासांत अटक! कदमवाकवस्तीत घडला होता प्रकार….


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतून सिमेंटची पोती पोहोचवण्यासाठी आलेल्या चालकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या ताब्यातील ५० लाख रुपये किंमतीचा ट्रक पळवून नेल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. या गुन्ह्यातील दोन्ही परप्रांतीय आरोपींना लोणी काळभोर पोलिसांना अवघ्या दोन तासाच्या आत इंदापुरातून अटक केली आहे. तर त्यांनी लपवून ठेवलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनुज कुमार रामसुरत पांडे (वय २४, रा. माधवपुर आचार, पोस्ट. आगई, कुडवार, जि. सुलतानपुर, राज्य उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मल्लीकार्जुन शांताच्या अवंती (वय ३३, रा. ९०/४३, मल्लीकार्जुन रोड, कोडला, ता. शेडम, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) व अशोक शिवाप्पा राठोड (वय ३९, रा. पद्मसागर कॉलनी, योगापुर रोड, जि. विजापुर, राज्य कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की ट्रकचालक अनुज पांडे हे हे त्यांचा भाऊ अतुलकुमार पांडे यांच्या मालकीच्या बीआर २४ जीडी २००८ या क्रमांकाच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतात. त्यांना त्यांच्या भावाने सांगितले की, ब्रोकर मल्लिकार्जुन अवंती यांनी सिमेंटचे भाडे सांगितले आहे. श्री. सिमेन्ट प्रा.लि. कंपनी, कलबुर्गी (कर्नाटक) येथून सिमेंट भरायचे असून बालाजी सिमेन्ट वेअरहाऊस, मनाली रिसॉर्टचे समोर, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे येथे खाली करायचे आहे. अशी अवांती यांची ऑर्डर मिळाली आहे. त्यानुसार अनुज पांडे यांनी कलबुर्गी येथून सिमेंटचा १ हजार पोत्यांचा माल भरला व माल पोच करण्यासाठी पुण्याच्या दिशेने १० ऑगस्टला निघाले.

       

ऑर्डरचा माल भरून पुण्याचे दिशेने साधारण १०० किलोमिटर अंतर आल्यानंतर कलमनुर गावाजवळ गाडीचे क्लचप्लेट खराब झाले. दोन दिवसानंतर गाडी दुरुस्त झाल्यानंतर अनुज पांडे हे पुण्याच्या दिशेने निघाले. ते कदमवाकवस्ती येथे मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी रात्रीच्या सुमारास पोहचले. तेव्हा मल्लिकार्जुन अवंती व अशोक राठोड यांनी जबरदस्तीने पांडे यांच्या हातातुन ट्रकची चावी घेतली. तसेच शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने ट्रकमध्ये बसवून घेऊन चालले होते. अशोक राठोड हा ट्रक चालवीत होता. त्याने रस्त्याच्या एका बाजूला अचानक ट्रक थांबविला.

या संधीचा फायदा घेऊन फिर्यादी हे सदर ठिकाणाहून पळून गेले. व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वरील दोघांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होती.

गुन्हाचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस हवालदार रामहरी वणवे यांना खबऱ्याने आरोपी हे इंदापूरच्या दिशेने गेले आहेत. अशी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक इंदापूरच्या दिशेने रवाना झाला. पोलिसांनी इंदापुरात सापळा रचून अवघ्या दोन तासाच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले. आरोपींन बेड्या ठोकल्या. त्यांचेकडे ट्रकबाबत विचारणा केली. तेव्हा दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी खाक्या दाखविताच ट्रकची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकही ताब्यात घेतला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार रामहरी वणवे, गणेश सातपुते, सचिन सोनवणे, सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!