बारामती येथील महात्मा फुले चौकात भीषण अपघात! डंपरखाली गाडी गेल्याने चालकासह दोन मुलींचा मृत्यू, घटनेने हळहळ..

बारामती : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. बारामतीतील महात्मा फुले चौकात आज साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकी डंपर खाली गेल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दिवसाची चालकाचे नाव आहे.
ओंकार आचार्य मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे तो वास्तव्यास होता. या घटनेत चार वर्षाची मधुरा ओंकार आचार्य व दहा वर्षाच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बारामती हळहळली.