बुलढाणा हादरलं! आठवीत शिकणाऱ्या दोन मित्रांनी ४८ तासांत संपवलं आयुष्य, नेमकं घडलं काय?

बुलढाणा : जवळपास ७ तास सोबत, अगदी अभ्यासापासून ते शाळेत खेळण्यापर्यंत दंगा, मस्ती करणाऱ्या दोन वर्गमित्रांच्या कहाणीनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतरानं आपलं आयुष्य संपवलं आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबतच कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. बुलडाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात आठव्या वर्गात शिकणा-या दोन वर्ग मित्रांनी राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
दरम्यान, दोन दिवसातील दुसऱ्या घटनेने जिल्ह्यातील पालकांमध्ये अस्वस्थता पसरली. अवघ्या चौदा वर्षे वयाच्या दोन विद्यार्थ्यांनी लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रही चिंतीत झाले आहे.

वैभवचे वडील कारागृह पोलीस आहेत. बुलडाण्यातील अल्पवयीन वर्गमित्र विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी पालकवर्गाला प्रचंड धक्का बसला आहे. या अनाकलनीय घटनांमागील कारण शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.