दोन मुलं शाळेत जातो म्हणून निघाली अन् परत आलीच नाहीत, पौड रोड परिसरातून धक्कादायक माहिती आली समोर, घडलं काय?

पौड रोड : येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी शाळेत जातो, असे सांगून घरातून निघालेली दोन अल्पवयीन मुले कोथरूड येथील पौड रोड परिसरातील किष्किंधानगरमधून बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे त्यांचा तपास सुरू आहे.
या घटनेने त्यांच्या कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनायक कसबे (वय 10) व गौतम मोरे (वय 10) अशी दोघांची नावे आहेत. विनायक आणि गौतम दोघेही शाळेत जातो, असे सांगून घरून निघाले. परंतु, ते शाळेत गेले नाहीत.
ते कुठे गेले याबाबत तपास सुरू आहे. ही मुलं दुसरीकडेच कोठेतरी निघून गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सायंकाळी ते दोघेही घरी आले नाहीत म्हणून पालकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. नंतर शाळेत चौकशी केली असता ते शाळेत देखील गेले नसल्याची माहिती समोर आली.
दोघे कोठे आढळून आल्यास त्याबाबत कोथरूड पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक संदीप पवार यांनी केले आहे. त्यांचे अपहरण केले गेले का? याबाबत देखील पोलीस तपास करत आहेत.