धक्कादायक! दोन सख्खे भाऊ बघत होते घाणेरडे व्हिडीओ, वडिलांनी विरोध करताच घडलं भयंकर..

चिखलदरा : दोन भाऊ गुपचूप मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ बघत होते. वडिलांना त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला आणि दोघांच्याही कानाखाली लगावल्या. वडिलांनी मोबाईलही विकून टाकला. या घटनेचा राग मनात धरून दोघांनी वडिलांना जमिनीवर पाडले आणि एकाने त्यांच्यावर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे.
सदर घटना ही चिखलदरा तालुक्यातील सोनापूर येथे 15 ऑगस्ट रोजी घडली. या दोन भावांवर स्वतः वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मुंगू दांडोळे (वय-45) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर सुमित (वय-19) आणि अमित (वय-18) अशी मुलांची नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी की, सुमित आणि अमित हे मोबाईलमध्ये पाॅर्न बघत होते. ते त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. ते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेतला. त्या दोघांना कानाखाली लगावल्या आणि तो मोबाईल विकून टाकला. वडील जेव्हा बाहेरून घरी आले तेव्हा दोघांनी मिळून वडिलांना जमिनीवर पाडले आणि सुमितने वडिलांवर चाकूने वार केले. ज्यात ते जखमी झाले.