दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून नेणाऱ्या दोन आरोपींना काळेपडळ पोलीसांनी राजस्थान येथून घेतले ताब्यात…

लोणी काळभोर : दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना काळेपडळ पोलीसांनी राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना जेरबंद करुन पिडीत अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१) व सुरेशकुमार मोहनलाल राणाभील, (वय ३१ वर्षे, दोघे रा. राणी, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका वेळेस दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याने सदरची बाब ही गांभिर्याने घेवून दाखल गुन्ह्याचे तपासात संशयीत इसमांचे मोबाईल क्रमांक मिळून आले.
सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर राजलक्ष्मी शिवणकर, सहा पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे तसेच गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, गणेश माने यांची टिम तात्काळ रवाना करुन सदर अल्पवयीन मुलींचा व संशयीत आरोपींचा वापी, सुरत, अहमदाबाद (गुजरात), फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपुर (राजस्थान) येथे तब्बल ३३०० कि.मी. प्रवास करुन आजुबाजुच्या परिसरात शोध घेवून मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे अल्पवयीन मुलींचा शोध घेतला असता त्यातील एक मुलगी ता. राणी, राज्य राजस्थान व दुसरी मुलगी जि. पाली, राज्य राजस्थान येथे मिळून आल्या.

अल्पवयीन मुलींना फुस लावणारे संशयीत आरोपी सुरेशकुमार प्रजापती व सुरेशकुमार राणाभील यांचा शोध घेवून नमूद आरोपीतांस जेरबंद करुन पिडीत अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर राजलक्ष्मी शिवणकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग नम्रता देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे युनिट -५, गुन्हे शाखेचे अंमलदार पो. हवा. शशिकांत नाळे, गणेश माने यांचे पथकाने केली आहे.
