मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट ; भाजपनं उद्धव ठाकरेंची केली नाकेबंदी, घेतला मोठा निर्णय?


मुंबई: बहुचर्चित मुंबई महापालिकेच्या सत्तेतून उद्धव ठाकरेंना पायउतार केल्यानंतर आता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची एका अर्थाने उद्धव ठाकरेंची आणखीन एक नाकेबंदी केली आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर निवडीबाबत ट्विस्ट आला आहे.आगामी महापौर निवडीच्या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी नियुक्तीचा जुना नियम बदलून सरकारने शिवसेना ठाकरे गटाची मोठी कोंडी केली आहे.

सरकारने नव्या महापौर निवडीच्या वेळी मावळते महापौर किंवा सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा नियम अधिसूचनेतून काढून बदललेला आहे. नव्या अधिसूचनेनुसार महापौर निवडीच्या कामकाजाचे अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात संघर्षाची ठिणगी पडणार आहे.

सरकारच्या जुन्या नियमानुसार नव्या सभागृहाच्या पहिल्या बैठकीत महापौराची निवड होईपर्यंत कामकाज पाहण्यासाठी ‘पीठासीन अधिकारी’ नियुक्त केला जात असे. हा मान एकतर मावळत्या महापौराला किंवा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला मिळत असे. त्यानुसार हा मान उद्धव ठाकरेंच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र हा अधिकार काढून तो प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आला आहे.

दरम्यान पीठासीन अधिकारी विरोधी पक्षाचा असल्यास सत्ताधाऱ्यांची तांत्रिक अडचण होण्याची शक्यता असते. नेमकी हीच ‘संधी’ हुकवण्यासाठी सरकारने नियमात बदल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!