खरात प्रकरणात ट्विस्ट! अजय मिश्रा यांच्या नकारानंतर ठाकरेंचे वकील सरकारची बाजू मांडणार?


पुणे: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात न्यायालयीन लढाईबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून जेष्ठ विधीज्ञ अजय मिश्रा यांची नियुक्ती केली होती.मात्र कामाच्या अतिरिक्त ताण असल्याचे कारण देत त्यांनी हा खटला लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे.त्यानंतर आता ही लढाई लढण्यास ठाकरेंचे वकील असीम सरोदे हे पुढे आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याच्या विरोधात आता तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याला कठोर शिक्षा व्हावी या उद्देशाने सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने सरकारची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी अत्यंत अनुभवी अशा अजय मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र त्यांनी कामाच्या अतिरिक्त ताण असल्याचे कारण देत हा खटला लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबाबत त्यांनी लेखी पत्रही पाठवले आहे.

खरात प्रकरणाचीं ही लढाई लढण्यासाठी आता शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत सुरू असलेल्या सुप्रीम कोर्टामधील न्यायालयीन लढ्यात उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे हे पुढे आले आहेत. त्यांनी सरकारी वकील म्हणून या खटला लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यांनी असे म्हटले आहे की,खरात सारख्या भोंदू बाबालाच नाही तर अश्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. असं असीम सरोदे म्हणाले.

सध्या ॲड.अजय मिसर हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू यशस्वीरीत्या मांडत आहेत.. या सर्व प्रकरणांना पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याने अशोक खरात प्रकरणासाठी वेळ काढणे शक्य नसल्याचे त्यांनी SIT ला पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची लढाई विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे लढणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!