कल्याण मारहाण प्रकरणात ट्विस्ट ; ‘त्या’ तरुणीने आरोपीच्या वहिनीसोबत केलं भयानक कृत्य..


पुणे :कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीयाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला असून तरुणीला मारहाण करण्यापूर्वी तिने आरोपीच्या वहिनीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये खाजगी रुग्णांलयामध्ये ही तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गौरव झा या परप्रांतीय व्यक्तीने डॉक्टरांची तातडीने भेट मागितली होती.मात्र तिने मीटिंग सुरू असल्याच सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने तरुणीला अमानुषपणे मारहाण केली. तिच्या पोटावर आणि छातीवर लाथा मारल्या तसेच तिचे केस ओढून तिला फरफटत बाहेर आणलं.
याप्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा दोघांनाही अटक करण्यात आली होती. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशा तसा त्या तरुणीने आरोपीच्या वहिनीला मारहाण केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

दरम्यान या व्हिडीओत आरोपी, त्याचे नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी आरोपी हा रिसेप्शनच्या दिशेने जात आहे. यानंतर त्याचे नातेवाईक त्याला बाहेर काढतात. तसेच त्याची आईही त्याला अडवत असल्याचे दिसत आहे. यानंतर ती रिसेप्शनवर असणारी तरुणी तिथे येते आणि त्याच्या वहिनीला कानशि‍लात लगावते. यानंतर ती त्याच्या वहिनीला सुनवताना दिसत आहे. यानंतर तो आरोपी बाहेरून येतो आणि तिच्या पोटात लाथ घातल्यास दिसून येत आहे. मात्र तरुणीने आरोपीच्या वहिणीला आधी मारहाण केल्याच्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!