महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; व्हाट्सअपच्या चॅटिंगमध्ये वेगळाच ट्रँगल, भाजप नेत्याचा धक्कादायक खुलासा…


पुणे: काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असताना भाजपच्या एका मंत्र्याने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिघांच्या मोबाईल चॅटींगमध्ये एक वेगळाच ट्रँगल असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.

मूळची बीडची असलेली महिला डॉक्टर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती. दोन वर्षांपासून काम करत असलेल्या महिला डॉक्टरने अचानक आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर नोट लिहिली. या नोटमध्ये प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाल बदने यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. आता या प्रकरणात भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी
सांगितले की, आम्ही त्या भगिनीचा आदर करतो. मात्र मोबाईल चॅटिंगवरून जो ट्रँगल समोर आला आहे, तो गंभीर असून लोकांसमोर आणण्यासारखा नाही. त्यामुळे कुणीही यावर राजकारण करू नये असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, फलटण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आहेत. तिन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कधी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर तिचे नसल्याचे आरोप होतात. मग कुटुंबीय हे हस्ताक्षर तिचेच असल्याचं सांगतात. या जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील चॅटिंग बघितलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे. असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.राज्यभरातून महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. आता या प्रकरणी आणखी नवी माहिती काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!