Tur Dal Prices : तुरडाळीचे दर घसरले, बाजारात नवीन माल येण्यास सुरुवात, सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा…
Tur Dal Prices : जवळपास वर्षभरानंतर तूरडाळीच्या दरांत घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर २० रुपयांनी कमी झाल्याचे दिसत आहे.
तसेच किरकोळ बाजारात तूरडाळ १८० रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ आणि इतर डाळीही शंभरीपार पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब झाली होती. मात्र, आता मागील काही दिवसांपासून तूरडाळीचे दर घसरले आहेत. यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. Tur Dal Prices
दरम्यान, मागील वर्षभरात तूरडाळीच्या दरात तब्बल ३५ ते ४० टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविली होती. घाऊक बाजारात १६५ ते १७० तर किरकोळ बाजारात १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत तूरडाळीचे दर गेले होते. मात्र, आता बाजारात नवीन माल येण्यास सुरुवात झाली आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत तूरडाळीचे दर तेजीत होते. परंतु, आता नवीन मालाची आवक होत असल्याने किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो २० रुपयांनी स्वस्त झाली आहे. बाजारात तूरडाळीसह मूगडाळही १० रुपयांनी उतरली आहे. तर चणाडाळ, मसूरडाळीचे दर स्थिर आहेत.