Tuljapur News : आई तुळजा भवानीचे दागिने वितळवण्यास परवानगी, २०६ किलो सोने वितळवणार..
Tuljapur News : सर्वांचे आराध्य दैवत तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले सोने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली वितळवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने नुकतीच यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Tuljapur News
यामध्ये एकूण २०६ किलो सोने वितळवण्यात येणार असून यानंतर मंदिर संस्थानला शुद्ध सोने मिळेल. मंदिर संस्थानकडे यापूर्वीचे ५० किलो शुद्ध सोने व ४०० किलो चांदी आहे. आता हे सोनं वितळवल्यानंतर याची शुद्धता समोर येईल. Tuljapur News
५० किलो शुद्ध सोने आरबीआयमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवले आहे. त्यावर मंदिर संस्थानला २.२५ % व्याज मिळत आहे. येथील सोन्या-चांदीची नुकतीच मोजदाद झाली. यामध्ये सोन्याच्या वस्तूंमध्ये मोठी वाढ झाली.
दरम्यान, २००९ नंतर भाविकांनी अर्पण केलेले २०६ किलो सोने तर २५७० किलो चांदीच्या वस्तू आढळून आल्या. यामुळे विधी व न्याय विभागाने नुकतीच यासाठी परवानगी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी हा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या नवरात्र उत्सव जवळ आला आहे. यामुळे मंदिर समिती याठिकाणी जोरदार तयारी करत आहेत.