Truck drivers strike : देशात पुन्हा पेट्रोल डिझेलची जाणवणार टंचाई? टँकर चालकांचे पुन्हा आंदोलन….
Truck drivers strike : हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपूर्वी हा संप मागे घेण्यात आला होता. पण आजपासून पुन्हा टँकर चालक आंदोलन करणार आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवणार आहे.
मनमाडच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून संपावर गेले आहे. टँकर चालकांनी पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
मनमाडच्या इंधन प्रकल्पात चालक फिरकलेच नाही. सकाळपासून एकही इंधन टँकर बाहेर पडला नाही. यामुळे पुन्हा पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. Truck drivers strike
दरम्यान, नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाईल, कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सात लाख रुपये दंड केला जाईल.
त्यामुळे नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला आहे, हा कायदा मागे घेण्यासाठी ट्रक आणि टँकर रस्त्यावर उतरले आहेत. तसेच कुठलयाही वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली नाही.