Truck drivers strike : ट्रकचालकांच्या संपाला वेगळे वळण, आता संपात पडली फूट, नेमकं काय घडलं?


Truck drivers strike : केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. संपाच्या दुस-या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचवेळी संपामध्ये फूट पडली आहे.

राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रकचालकांनी संप मागे घेतला आहे. कोल्हापूरमधील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंधन वाहतूक करणा-या वाहनधारकांनी पुकारलेला संप रात्री उशिरा मागे घेतला आहे. Truck drivers strike

परंतु राज्यातील इतर ठिकाणी संप सुरूच आहे. केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात आहे. या कायद्यास देशभरातील ट्रकचालकांनी विरोध करत एक जानेवारीपासून संप सुरू केला आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते.

पुण्यात संप सुरूच…

पुणे शहरात ट्रकचालकांनी संप कायम ठेवला आहे. सोलापुरात पेट्रोल पंपावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने नागरिकांनी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत.

विदर्भातील संप मागे..

सरकारशी चर्चा केल्यानंतर विदर्भातील ट्रकचालकांनी संप मागे घेतला आहे. नागपूर आणि विदर्भातील ट्रकचालकांनी संप मागे घेतला आहे. रस्त्यांवर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. ट्रकचालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही झाला आहे.

दुसरीकडे अमरावतीमध्ये पेट्रोलपंपावर पहाटे पासूनच वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस दिसून आल्या तसेच सर्वसामान्यांनाही फटका बसला आहे.

दरम्यान, ट्रकचालकांच्या देशव्यापी संपाचा पेट्रोल-डिझेलला फटका बसला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोलपंपांवर आज सकाळपासूनच ‘पेट्रोल-डिझेल नाही’ असे फलक लावले आहेत.

सोमवारी दिवसभरात पेट्रोल-डिझेलचे टँकर आले नसल्याने, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपावर डिझेल-पेट्रोल मिळत नसल्याने ट्रक, टेम्पो पंपावर लावण्यात आले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर काल संप पुकारण्यात आला होता. यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यातील सर्व पेट्रोलियम कंपनीच्या टँकर चालकांसह वाहनचालक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं.

याचा मोठा फटका हा इंधन वाहतुकीला बसला. पेट्रोल- डिझेलचा तुटवडा होण्याच्या भीतीनं सोमवारी वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनाच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळाल्या. मात्र आता संप मागे घेण्यात आल्यानं वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!