दिल्लीत तिरंगी चुरस!! राहुल गांधी आणि एस. जयशंकर यांनी बजावला मतदानाचा हक्क, राजधानीत कोण झेंडा फडकवणार?


नवी दिल्ली : आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजधानीतील सर्व 70 जागांसाठी आज दिल्लीकर मतदान करणार आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. यामुळे मोठी चुरस बघायला मिळत आहे. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपने ही निवडणूक चुरशीची केली आहे.

सकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. तसेच भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील के. कामराज लेन येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघातील आपच्या उमेदवार आतिशी यांनी मतदान करण्यापूर्वी कालकाजी मंदिरात प्रार्थना केली. अनेक आमदार निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीला सोडून गेले यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने देखील जोरदार प्रचार केला आहे.

राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूक होत आहे. आज मतदान घेतले जात आहे. यामध्ये सुमारे 1.56 कोटी मतदार असून, ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आता या मतदानाला सकाळी सातपासून सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहापर्यंत हे मतदान चालणार आहे. यामुळे दिल्लीत कोणाचे सरकार येणार लवकरच समजणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मात्र, एक्झिट पोल संध्याकाळी साडेसहानंतर जाहीर केले जाणार असल्याने चित्र समोर येऊ शकणार आहे. या 5 वर्षात दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अटक करण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!