Trending News : वाघोबाची गावात रॉयल एन्ट्री, घराच्या भिंतीवर झोपला अन् सगळीकडे गोंधळच गोंधळ, पाहा थरारक व्हिडीओ..


Trending News : मानवाने जंगले तोडून मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट उभारण्यास सुरूवात केली अन् वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. मनुष्याच्या या आक्रमणानंतर नाईलाजाने वन्यजीवांनी शहरांकडे, गावांकडे मोर्चा वळवत मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव केला.

तसेच शहरात, गावात बिबट्या, वाघाचे दर्शन झाल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अनेकदा हे प्राणी हल्लाही चढवतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, उत्तर प्रदेशाच्या पिलीभित व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ थेट शेजारच्या गावाकडे आला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा वाघ गाव गावात शिरला आणि भिंतीवर जाऊन बसला. Trending News

त्यानंतर सकाळी गावकऱ्यांनी उठल्यानंतर हा प्रकार पाहिला यावेळी गावकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर या वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी देखील केली.

तसेच वाघ गावात शिरल्याचे समजताच काही लोकांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघ काही गेला नाही. नाही सध्या वाघाच्या या थरारक भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!