सातबाऱ्यावर नोंदी करणाऱ्या हातांनी लावली झाडे, हवेली महसूल विभागाचा पर्यावरणपूरक उपक्रम; श्रीरामनगरमध्ये ५० झाडांचे वृक्षारोपण

पुणे : १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त हवेली तालुका महसूल विभागाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत श्रीरामनगर गावच्या शिवारातील रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५० झाडांचे वृक्षारोपण केले
रोज हातात लेखणी घेऊन सातबाऱ्यावर नोंदी करणारे महसूल अधिकारी आणि कर्मचारी रविवारी एका वेगळ्याच भूमिकेत दिसून आले. हवेली तालुक्यातील श्रीरामनगर येथे महसूल विभागातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात हे अधिकारी आणि कर्मचारी हातात कुदळ, फावडे, घमेले घेऊन झाडे लावताना दिसले.. या उपक्रमात हवेली तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार स्वाती नरूटे, नायब तहसीलदार सचिन आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र पवार, पोलिस पाटील संजय शिंदे, मंडळ अधिकारी किशोर पाटील, सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील, संदीप शिंदे, तसेच सर्व तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
. या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी महसूल विभागाचे अभिनंदन केले. “फक्त शासकीय यंत्रणा नव्हे, तर आम्हीही या झाडांची निगा राखू,” असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.