प्रेमात अडकवलं, अश्लील फोटो काढले, पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर अत्याचार, घटनेने खळबळ..

पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका एअर होस्टेस तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे.
आरोपीनं पीडित तरुणीचे अनेक खासगी व्हिडीओज आणि फोटोज शूट केले होते. याच फोटोजच्या आधारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. संबंधित अश्लील फोटो घरच्यांना पाठवेन, अशी धमकी देत आरोपीनं पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय पीडित तरुणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवली येथील रहिवासी आहे. ती काही दिवसांपूर्वी एअर होस्टेसचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील वाकड परिसरात ती आपल्या एका मैत्रीणीसोबत राहत होती.
यावेळी तिची ओळख मैत्रीणीचा भाऊ विजय आबासाहेब शिंदे या तरुणासोबत झाली. काही दिवसांत दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपी तरुणाने एअर होस्टेसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर दबाव टाकून आणि स्वतःच्या जीवाचं बरे वाईट करून घेईल, अशी धमकी देत विद्यार्थिंनीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
आरोपीनं पुण्यातील डांगे चौक येथील लॉजवर आणि रुमवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. हेच अश्लील फोटो घरच्याना पाठवेन, अशी धमकी देत आरोपीनं पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केलं.
दरम्यान, यानंतर पीडित तरुणीने अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून रविवारी रात्री उशिरा पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विजय शिंदे याच्याविरुद्ध शून्य एफआयआर नोंदवला. यानंतर पैठण पोलिसांनी हे प्रकरण वाकड पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड पुणे) कडे वर्ग केला आहे.