राज्यात पोलिस उप अधीक्षकांसह सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या! पुणे, पिंपरीचाही समावेश

पुणे : राज्यातील 119 पोलीस अधिकाऱ्यांनच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांना आता नवीन ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
यामध्ये राज्य गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे अॅन्टी करप्शन विभागातील अधिकार्यांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली आहे.
तसेच चाकण उपविभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली झाली आहे. वाकड उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर दिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे.