Train Accident : देशात पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात! दोन गाड्या समोरासमोर एकमेकांना धडकल्या, १४ जणांचा मृत्यू, १०० जण जखमी..
Train Accident आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण रेल्वे अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत १०० जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
एएनआयच्या एजन्सीच्या वृत्तानुसार, विझियानगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी ट्रेन दुसऱ्या ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला. अलमांडा आणि कंटकपल्ले सेक्शन हा अपघात घडला. Train Accident
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखाहून रायगडाकडे जाणाऱ्या रेल्वेचे डबे कोठावलसा अलमंडा-कंटकपल्ली येथे रुळावरून घसरले. अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले असून मदत आणि बचावकार्य राबवण्यात येत आहे.
या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर जखमी झालेल्या लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिन्यांची व्यवस्था करण्याचे आदेश देखील दिले आहे.