क्रिकेट खेळताना घडलं आक्रीत! 32 वर्षीय तरुणाचा ह्दयविकाराच्या झटक्यात मृत्यू, इंदापूर येथील घटनेने सगळे हळहळले…

इंदापूर : याठिकाणी गलांडवाडी नंबर दोन (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी क्रिकेट खेळताना 32 वर्षे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. किरण युवराज चव्हाण (वय-32, रा. सरडेवाडी, जाधव वस्ती ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी किरण यांच्या छातीत अचानक दुखू लागले. सुरुवातीला कोणाला काही समजले नाही. इतर तरुणांनी त्यास तात्काळ उपचारासाठी इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
याठिकाणी गेल्यानंतर किरण यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा तपास पोलीस हवालदार आप्पा हेगडे करत आहेत. याबाबत किरण चव्हाण यांचा भाऊ यांनी विठ्ठल अजिनाथ महाडीक (रा. सरडेवाडी, जाधव वस्ती, ता. इंदापुर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

दरम्यान, सध्या शाळेत मैदानात तसेच अनेक ठिकाणी व्यायाम करताना देखील अशा घटना तरुणांमध्ये घडत आहेत. यामुळे याबाबत सगळ्या गोष्टी काळजी करून करणे गरजेचे आहे. याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांमध्ये सध्या या घटना वाढत चालल्या आहेत.