खेळता खेळता घडलं आक्रीत! चिमुकल्या बहीण-भावाचा हृदयद्रावक शेवट, कुटूंबाला मोठा धक्का…

लातूर : एका विहिरीत बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औसा शहरालगत असलेल्या भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान परिसरात घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. अलीना समीर शेख (वय 5 वर्षे) आणि उस्मान समीर शेख (वय 3 वर्षे ) हे दोन सख्खे बहिण भाऊ दुपारी खेळत खेळत घराबाहेर आले आणि खेळताना अचानक विहिरीत पडले.
मयत बहीण भाऊ विहिरीशेजारी खेळत होते. अचानक त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही बालकांचे पालक मजुरी करुन आपली उपजिविका भागवतात. दुपारी दोन्ही मुलं घरात दिसत नसल्याने पालक शोध घेत होते. परंतु त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. नंतर शेजारी असलेल्या विहीरीत शोध घेतला असता दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले.
त्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकाच घरातील लहानग्या दोन सख्ख्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. औसा शहरालगत असलेल्या भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली.
याठिकाणी रोज आपली मुलं खेळतात, म्हणून येथे शोध घेतला असता विहिरीत काही गोष्टी दिसून आल्या, यानंतर तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला. विहीरीत काटेरी फांद्याच्या सहाय्याने शोध घेतला असता दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.