भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन निमित्त पुण्यात वाहतूक बंद राहणार! पुणेकरांनो जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद…

पुणे : पुणे शहरात भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळा निमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावेळी अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी करण्यात आली आहे.

एक जानेवारीला हा सोहळा आहे.
दरवर्षी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होतो. यावेळी विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे.


मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे नगरकडे जावे.तसेच लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधीमल राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, मरकळ पुल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
तसेच पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरुन वळून मुंढवा, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरुकडे जावे.
याबाबत माहिती वाहतूक शाखेच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, या पुलावरुन केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे याबाबत नियम पाळावे लागणार आहे.
