फॅन्सी नंबरसाठी वाहतुक पोलिसाची तोडपाणी! पोलिसाची तडकाफडकी निलंबन..!!


पुणे : दुचाकी चालकाकडून फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे पैसे घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहतूक पोलिसाला तात्काळ निलंबित केल्याची घटना पुणे शहरातील लष्कर परिसरात घडली आहे.

पोलिस हवालदार विजय मेवालाल कनोजिया असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय कनोजिया हे शनिवार ३० मार्च रोजी महावीर चौकात कर्तव्यावर होते. या ठिकाणी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोहिनूर हॉटेलच्या बाजूने महावीर चौकात एक दुचाकी आली. या दुचाकीचे नंबर फॅन्सी असल्याने कनोजिया यांनी दुचाकी चालकाला दंडात्मक कारवाईची भीती दाखविली. त्यानंतर संबंधित दुचाकीस्वारावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता पैसे घेऊन त्याला सोडून दिले.

यावेळी येथे उपस्थित असलेल्या कोणीतरी एकाने त्याचा व्हिडीओ बनवून मार्च एन्ड एम जी रोड, असा मेसेज तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल झालेल्या या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. कनोजिया यांच्या संशयास्पद वर्तनाची क्लिप सोशल मीडियावर आल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने, त्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी काढला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!