मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी मिटली ; उरण-कर्जत-शिरूर महामार्गाच्या हालचालीना वेग, प्रवास सुसाट…

मुंबई : मुंबई -पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आता सरकारकडून,महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या उरण–कर्जत–शिरूर महामार्गाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवासाचा सुसाट होणार आहे.

मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवरील भार कमी करण्यासाठी उरण -कर्जत- शिरूर महामार्गाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून मंत्रालयात प्रलंबित होता. मात्र अलीकडच्या काळात आमदारांनी हा मुद्दा आक्रमकपणे विधानसभेत मांडल्यानंतर या हालचालींना वेग आला आहे.हा प्रकल्प अद्याप मंजुरी आणि अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर या पर्यायी मार्गाबाबत प्रशासन लवकर निर्णय घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या महिन्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 32 तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे हजारो प्रवासी तासन् तास अडकून पडले. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होतेत्यामुळे पुणे–मुंबई दरम्यान एकाच मार्गावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर सुमारे 135 किलोमीटर लांबीचा शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–उरण असा चारपदरी मल्टिनोडल कॉरिडॉर प्रस्तावित आहे.

दरम्यान हा मार्ग सुरू झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. औद्योगिक भागांतील मालवाहतूक थेट उरण बंदराशी जोडली गेल्यास मोठी सोय होणार आहे. त्यामुळे लवकरच या पर्यायी मार्गाबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.