पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार ; 11 किमीचा डबलडेकरचा उड्डाणपूल होणार, वर मेट्रो..खाली बस धावणार!


पुणे : पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रोची मार्गिकेच्या कामाची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. आता या उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. रामवाडी ते वाघोली दरम्यानचे मेट्रोचे काम महा मेट्रो करणार आहे. त्यासोबत वाहनांसाठी उड्डाणपूलदेखील महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनकडून बांधला जाणार आहे. मेट्रो प्रशासनाने वाघोलीपर्यंत केलेला कामाचा खर्च एमएस आयडीसीकडून महामेट्रोला दिला जाणार आहे.

महामेट्रो, ‘एमएसआयडीसी’ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यानुसार रामवाडी ते वाघोली हा ११.६३ किलोमीटरचा डबलडेकरचा मार्ग महामेट्रो करणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या मार्गासाठी महामेट्रोला तीन हजार ६२६ कोटी रुपये लागणार आहेत, पण मेट्रो व महामार्ग अशा डबलडेकर मार्गांमुळे खर्च वाढणार आहे. वाढणारा खर्च एमएसआयडीसीकडून महामेट्रोला दिला जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच या उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे.

दरम्यान मेट्रोच्या कामासाठी सध्या कर्ज घेण्यात आले आहे. पण उर्वरित पैशांची तरतूद कशी करायची याबाबत लवकरच मुख्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठक पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!