‘परंपरा महाराष्ट्राची, मैदान शिवतीर्थाच, आवाज शिवसेनेचा….’ ; ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध

पुणे : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव सेना आणि शिंदे सेनेत दसरा मेळाव्यावरून गेल्या दोन वर्षात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. यंदाही मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंचीं तोफ धडाडणार आहे.आता उद्धव सेनेने दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध केला आहे.परंपरा महाराष्ट्राची, मैदान शिवतीर्थाच, आवाज शिवसेनेचा, नेतृत्व ठाकरेंचं, हुंकार शिवसैनिकांचा या आशयाखाली दुसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध झाला आहे.

मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. यंदाही 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या दोन्ही मेळाव्यात काय भाषणे होतात, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे तर आझाद मैदानावर शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी सूर जुळल्याने आणि हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने मनसे आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. शिवाजी पार्कात दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. यंदा गर्दीचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. दसऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यंदा अतिवृष्टीने आणि महापूराने या भागात मोठे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यावर पावसाचा जुलूम सुरूच आहे.महापूराने अनेक गावांना वेढा घातला आहे. पावसाचे सावट असल्याने या भागातून दसरा मेळाव्याला जाणाऱ्यांसमोर संकट उभं ठाकलं आहे. दसऱ्या मेळाव्यात ठाकरे या सर्व प्रश्नांवर सरकारवर हल्लाबोल केल्याशिवाय राहणार नाहीत.
