सिंहगडावर पर्यटकांची पळापळ, मुली वाचवा वाचवा म्हणून ओरडत होत्या, कारण..
पुणे : काल सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. गाडी तळापासून पुणे दरवाजापर्यंत आणि गडावरील पायवाटांवर
दाटीवाटीने पर्यटक चालत होते.
असे असताना तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत होत्या. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी घेतली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला.
असे असताना आता मोठ्या प्रमाणावर याठिकाणी गर्दी झाल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. यात सुमारे ५९ पर्यटक जखमी झाले. त्यामुळं पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या गडावर मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या. परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते.
धूर करुन मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा उपयोग झाला नाही. याठिकाणी जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन सिंहगडावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.