अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, बारामती जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय…


बारामती : बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सस्ते यांनी एका प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 30 हजार रुपये दंड केला असून दंडातील निम्मी रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. यामुळे अशा घटनांना आळा बसेल असे सांगितले आहे.

याबाबत माहिती अशी की, या आरोपीच्या पत्नीची लहान बहीण बालगृहात राहात होती. शिक्षणाच्या निमित्ताने आरोपी तिला गावी घेऊन आला. तसेच 2019 मध्ये पत्नी घरात नसताना पीडितेला धमकावत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. अनेकदा तिच्यासोबत राहून नको ते कृत्य केले.

तसेच तिला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारीन अशी धमकी दिली. मुलीनी आरोपीची आई व त्यानंतर तिच्या आजीला हा प्रकार सांगितला. पीडितेच्या बहिणीलाही हा प्रकार समजला. त्यामुळे तिचे पतीशी भांडण झाले. हा वाद पुढे वाढतच गेला. तिने विषारी औषध प्राशन केले, त्यात तिचा मृत्यू झाला. यामुळे प्रकरण अजूनच वाढले.

यानंतर आरोपीविरोधात पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बी. बी. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच तपास सुरू केला. सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी याबाबत न्यायालयात युक्तिवाद केला. सात साक्षीदार तपासले.

पीडितेने झालेली घटना न्यायालयात सांगून पीडितेचा जबाब व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश सस्ते यांनी आरोपीला आजन्म कारावास व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाच्या सहा वर्षांनी निकाल दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!