लग्नानंतर तीन महिन्यातच छळ अन् त्रास, पुण्यात नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन…

पुणे : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहीत लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात आत्महत्या केली असल्याचं उघड झालं आहे. ही घटना पुण्यातून समोर आली आहे. या नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं असल्याचं उघड झालं आहे.

याप्रकरणी मृत महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, ही घटना पुण्यातील बाणेर परिसरात घडली आहे. मृत महिलेचं नाव गंगा तेजस बेंबळकर (वय २७) असे आहे. तर तिच्या पतीचे नाव तेजस शिवा बेंबळकर असे आहे. तेजस याने अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतले आहे. तेजस आणि गंगा यांचा विवाह ३ महिन्यांपूर्वी झाला. मात्र लग्नानंतर गंगाला सासरच्या मंडळींकडून छळाला समोर जावं लागलं.

या छळाला कंटाळून गंगाने अवघ्या तीन महिन्यातच आपलं जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सासरच्या छळाला कंटाळून गंगा या नवविवाहितेने राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप गंगाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
याप्रकरणी मृत पावलेल्या महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,नवरा, सासू, नणंद आणि सासरे यांच्या विरोधात पुण्यातील बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.