PSI पदाच्या परीक्षेत राज्यातून अव्वल, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ…


पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यात एक हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अश्विनी केदारी ही 2023 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महिला प्रवर्गात राज्यात पहिली आली होती.

अशातच मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र तिचा हा लढा अपयशी ठरला असून या निधनाच्या बातमीने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

       

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी अश्विनी केदारीसोबत एक दु:खद प्रसंग घडला होता. सकाळी अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. त्यानुसार पाणी किती गरम झाले आहे, हे पाहण्यासाठी जेव्हा ती बाथरूममध्ये गेली त्याच वेळी हीटरचा मोठा झटका तिला लागला. या शॉकमुळे उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले आणि या भीषण अपघातात ती तब्बल ८० टक्के भाजली.

घडलेला प्रकार लक्ष्यात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु केले. या दरम्यान गेल्या ११ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज होती. मात्र त्यात आता अपयश आले असून उपचारादरम्यान तिचे दौर्दैवि निधन झाले आहे.

दरम्यान, २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने सर्वत्र सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाथरुममध्ये हिटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर सांडल्यामुळे केदारी जवळपास ८० टक्के भाजल्या होत्या. मात्र अकरा दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या. अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!