शिक्षणात टॉप, गुन्हेगारीत टॉप ; दहशत निर्माण करणाऱ्या पुण्यातील घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ कोण?


पुणे : गेल्या काही दिवसापासून शांत असलेली पुण्यातील घायवळ टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.बुधवारी मध्यरात्री निलेश घायवळ टोळीने दोन कांड केले आहेत. कोथरूड भागात घायवळ टोळीच्या चार ते पाच गुंडांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला. मुठेश्वर परिसरात प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार केल्यानंतर याच गुंडांनी काही अंतरावर सागर साठे नावाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार केले आहेत… एकाच रात्री एकाच टोळीने अशाप्रकारे दोन गंभीर गुन्हे केल्याने पुण्यात पुन्हा एकदा निलेश घायवळ टोळी चर्चेत आली आहे.

कोण आहे निलेश घायवळ?

निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं, यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. मात्र, गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं. दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.

       

शिक्षणात टॉप असणारा निलेश घायवळ मारणे टोळीशी संपर्कात येऊन बिघडला.निलेश घायवळ हा उच्चशिक्षित असून त्याने ‘मास्टर इन कॉमर्स’ एम.कॉम पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. पण तो पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत आल्यानंतर त्याला वाईट नाद लागला.घायवळ हा खंडणी, टोळीयुद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांसह अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहे. घायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आले आहे. तो पुण्यातील टोळीयुद्ध, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यामध्ये होता. निलेश घायवळ मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवासी आहे. निलेश घायवळ विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी तो गुन्हेगारी जगतात शिरला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!