उद्या पुण्यात ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार!
पुणे : देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उद्या म्हणजे बुधवारी लष्कर पाणीपुरवठा पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे. यात रामटेकडी मुख्य जलनलिके वरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
यामुळे लष्कर पंपिंग रामटेकडी टाकीवरील अखत्यारीतील भागाचा पुर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे.
गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड दाबी बाजू मांडी बी.टी. रोड, भीमनगर, बालाजी नगर विकास नगर याठिकाणी पाणी येणार नाही.
तसेच कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी येथे पाणी येणार नाही.