टोमॅटोच्या दरात पुन्हा उच्चांक!! दरात झाली मोठी वाढ, शेतकरी मालामाल, जाणून घ्या…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना वाढीव किमतीने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत हिरव्या भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

बाजारात हिरव्या भाज्यांचे विविध प्रकार आहे. या भाज्यांच्या दरात 30 टक्क्यांवरुन 120 ते 160 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. टॉमेटो तसेच फुलकोबीचा भावही अवघ्या पंधरा दिवसांत 160 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरेदी करताना मात्र अनेकांचे बजेट कोलमडले आहे.
एका बाजूला ग्राहकांना फटका बसत असताना दुसऱ्या बाजूला बळीराजाला फायदा होत आहे. देशात सगळीकडे दर सध्या वाढले आहेत. सध्या मुंबई आणि दिल्लीत देखील मोठ्या प्रमाणावर दर वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या भाज्यांचा पुरवठा कमी झाला आहे.

टोमॅटो सध्या 80 ते 100 च्या घरात विकला जाऊ लागला आहे. जूनमध्ये 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता वाढला आहे. दिल्लीच्या आझादपूर मंडीसह इतर लहान बाजारपेठांमध्ये त्यांची आवक कमी झाली आहे. पावसामुळे इतर राज्यातील भाज्यांचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचे भाव वाढले आहेत.
सध्या 30 टक्क्यांवरून 140 ते 150 टक्क्यांपर्यंत भाज्यांचे दर वाढले आहेत. यामुळे आता शहरातील गृहिणींचे बजेट कोलंडणार आहे. सध्या पावसाने विश्रांती दिली असती तरी मागतील महिन्यांपूर्वी मोठ्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.