पुण्यात टोमॅटो दराने केला विक्रम, क्रेटला २५०० रूपये भाव, शेतकरी मालामाल..


पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर खूपच वाढले आहेत. यामध्ये टोमॅटोने तर सध्या कहरच केला आहे. पुण्यात टोमॅटोच्या दराने इतिहास रचला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत.

काही दिवसांपासून टोमॅटोचा भाव वाढला असल्याने किलोला १०० ते १५० रूपये दर मिळत आहे. यामुळे काही अंशी टोमॅटो उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पुण्यातील नारायणगाव येथे टोमॅटोच्या दराला उच्चांकी दर मिळाला आहे.

चांगल्या प्रतिच्या टोमॅटोच्या २० किलोच्या एका क्रेटला दोन ते अडीच हजार रुपयांचा उच्चांकी दर ठरला. यामुळे गेल्या अनेक दिवसांचे रेकॉर्ड मोडले गेले आहे. २० किलोच्या टोमॅटो क्रेटचा भाव पाचशेच्या आसपास होता.

यानंतर मागच्या १५ दिवसांत हा भाव वाढत गेला. हाच भाव आता २००० ते २५०० चा भाव मिळत आहे. जून महिन्याच्या शेवटी बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीतून करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे सचिव रूपेश कवडे यांनी माहिती दिली.

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागच्या महिन्याच्या सुरुवातीस उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीत टोमॅटोची आवक झाली होती.

तुलनेने मागणी कमी झाल्याने अतिशय कमी भावात टोमॅटो विकणे भाग पडले. काही शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून दिले होते. मात्र आता दर वाढले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!