स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने दगडाने मारहाण; गुन्हा दाखल! दोघांना अटक

पुणे : ऑफिसमध्ये लावलेल्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने चार जणांनी फिर्यादीला दगडाने मारहाण केली आहे. तसेच फिर्यादी यांच्या शॉपमधील दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन तोडफोड केल्याची धक्कादायक घटना आंबेडकर नगर येथील आर.के. कॉलनीजवळून समोर आली आहे.
महंमद शकील खान (वय-४५ रा. आर.के. कॉलनी, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नितीन दत्तु तडेकर व ज्ञानेश्वर म्हस्के (वय-२१ दोघे रा. आंबेडकर नगर) यांना अटक केली आहे. तर ओंकार पवार, बाबा मिसाळ व त्याच्या इतर दोन अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी त्यांच्या शॉपमधून घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस आरोपी नितीन तडेकर याने त्याच्या कार्य़ालयात लावलेल्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून त्यांच्या अंगावर दगड फेकून मारले. त्यामुळे फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्य़ादी यांच्या शॉपवर जाऊन दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्य़ादी यांच्या शॉपमधील काच फोडून व दरवाजाचे नुकासन करुन पळून गेले.
दरम्यान, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.