मोठी बातमी! मला सलाईनधून विष, माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीस यांचा डाव, मनोज जरांगे उपोषण सोडून सागर बंगल्याकडे रवाना..!!


Manoj Jarange : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेले असताना, राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीतुन आरक्षण हवय अशी, भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशातच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आज मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाइमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता असा धक्कादायक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या पण चाळे बंद करा असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केला आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या.. मात्र खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेल अशा शब्दात जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या.. मी आत्ता सागर बंगल्यावर येतो.. मला त्या ठिकाणी गोळ्या घाला.. मात्र खोटे आरोप सहन करणार नाही. असं जरांगे पाटील म्हणाले आहे.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरूच आहे. रविवारी म्हणजेच आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजासमोर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!