मॉर्निंग वॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाची झडप! ट्रक अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, घटनेने महाराष्ट्र हळहळला..


गडचिरोली : येथील काटली गावात एक भीषण अपघात घडला आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांवर एक भरधाव ट्रक चढल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गडचिरोली मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली येथे घडली. काटली या ठिकाणी काही तरुण हे पहाटे मॉर्निंग वॉक करण्यसाठी गेले होते. मॉर्निंग वॉक करत असताना हा अपघात झाला. या अपघातात एकूण सहा विद्यार्थी जखमी झाले होते. अचानक ही घटना घडली आहे.

दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित दोन विद्यार्थ्यांची स्थिती चिंताजनक आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी चक्काजाम करून निषेध व्यक्त केला. नागरिकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड संताप आहे. त्यांनी सुसाट वेगाने वाहने चालवणाऱ्या व मद्यपी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!