धक्कादायक! हात-पाय बांधले अन्… नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याची हत्या, घटनेने खळबळ

मुंबई : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील तथा बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्याची हत्या झाली आहे.

या अभिनेत्याचे नाव प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री असून त्याची नागपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे.एका कुख्यात गुन्हेगाराने किरकोळ वादातून त्याच्याच साथीदाराची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, सुपरस्टार अमिताभ बच्चनयांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झुंड’ या सिनेमात प्रियांशू छेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. रात्री त्याला वायरने बांधून क्रूरपणे संपवण्यात आले.

प्रियांशुचे दोन्ही हातपाय वायरने बांधून त्याची हत्या करण्यात आली. अर्धनग्न आणि अतिशय गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना प्रियांशु आढळला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शस्त्राचे अनेक ठिकाणी भीषण घाव, मोठा रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली.पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.तसेच या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशयित ध्रुवकुमार लालबहादूर साहू हा उत्तर नागपुरातील नारा परिसरात राहतो.
