शिक्षिकेवर हेल्मेट फेकून, निलंबित करण्याची धमकी; पेरणे शाळेतील मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल!


पुणे : राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्याच शाळेतील शिक्षिकेला छोट्याश्या कारणावरून शिवीगाळ करत, हेल्मेट फेकून मारले व निलंबित करण्याची धमकी दिल्याची घटना हवेली तालुक्यातील पेरणे येथून समोर आली आहे. हि घटना आज बुधवार (ता. २८) घडली आहे.

शिक्षिकेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मुख्यध्याप बाळासाहेब नारायण जाधव (रा. चाकण, तळेगाव दाभाडे चौक, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिका पेरणे येथील राधाकृष्ण विद्यालय मागील दोन महिन्यापासून नोकरी करत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी १० वाजता शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव हे प्रशालेमध्ये त्यांची खासगी दुचाकी चार्जिंग करत असताना, संबंधित शिक्षिकेने त्यांना प्रशालेमध्ये खासगी गाडी चार्जिंग करू नका, असे सांगितले.

याचा राग आल्याने मुख्यध्यापकाने शिक्षिकेस शिवीगाळ करत, अंगावर धावून गेले. तसेच शिक्षिकेला हेल्मेट फेकून मारले. सुदैवाने शिक्षिका बाजूला झाल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

दरम्यान, मुख्यध्यापक जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!