तीन वर्षांच्या चिमुरडीचा भिंतीवर आपटून खून; देहूरोड पोलिसांनी बापाला ठोकल्या बेड्या


पुणे : तीन वर्षांची चिमुरडी रडत असल्याच्या कारणावरून सावत्र बापाने तिला भिंतीवर आपटले. यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (ता. १२) देहूरोड ठाण्यातील चिंचोली येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महादेव नारायण गायकवाड (वय. २२ रा. चिंचोली) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, आरोपी महादेव गायकवाड हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. महादेव आणि त्याचे वडील हे दोघेही पुणे स्टेशन येथे सफाईचे काम करीत असल्याची माहिती आहे. आरोपीला दोन महिन्यांपूर्वी तीन वर्षीय चिमुरडी आणि तिची आई पुणे रेल्वे स्टेशन परिसरात भेटले होते.

महादेव याच्या वडिलांनी दोघींना चिंचोली येथे घरी आणले. महादेव याच्यासोबत चिमुरडीच्या आईचे लग्न लावून देऊ, अशी बोलणी त्यांनी केली. त्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपूर्वी दोघांचे लग्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, आरोपी महादेव याची तीन वर्षांची सावत्र मुलगी रडत होती. याचा राग आल्याने आरोपीने मुलीच्या पोटात लाथा- बुक्क्यांनी मारहाण करीत तिला उचलून भिंतीवर आपटले.

यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहुरोड पोलिस तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!