प्रसुतीवेळी तीन महिलांचा मृत्यू, डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय ताकद? बीडमध्ये नेमकं चाललंय काय?


बीड : पुण्यात गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असताना आता बीडच्या जिल्हा रुग्णालयात सकाळी एका मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता चौकशीसाठी त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. छाया पांचाळ असं मृत मातेचे नाव होते. या मातेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत पाच सदस्य समिती समोर छाया पांचाळ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. असे असताना स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून कागदपत्रे बदलल्याची चर्चा रुग्णालयात सुरू आहे. यामध्ये डॉक्टरांना वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांनीही फिल्डिंग लावल्याची माहिती पुढे येत आहे.

हे प्रकरण ताजे असतानाच सकाळी आणखी एका मातेची प्राणजोत मालवली. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयात झालेल्या मातेच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. आठवड्यातील हा तिसरा माता मृत्यू आहे.

येथील डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा सध्या कोलमडली आहे. डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचा पदभार आहे. आठवडाभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही नेमकं कोणाच्या भरवशावर आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या निलंबनानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा ही पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!