सहजपूर फाट्यावर केमिकल टॅंकरला तीन वाहने धडकून पेटली ! पुण्याकडे जाणारी वाहतुक दोन तास झाल्याने ठप्प !!
उरुळीकांचन :दौंड तालुक्यातील सहजपुर गावाच्या हद्दीत
पुणे -सोलापूर महामार्गावरती सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला सहजपुर फाटा भागात केमिकल युक्त टॅंकरला धडक दिल्याने पुण्याकडे जाणारी संपूर्ण वाहतूक दोन तास खोळंबली होती. शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास झालेल्या तीन जड वाहतूक वाहनांना लागल्याने आगीचे मोठे तांडव पुणे सोलापूर महामार्गावर पहायला मिळाले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील घडलेल्या या घटनेने अग्निशामक दलास लागलेला उशिर व आग आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी कोणताही यंत्रणा उपलब्ध नसल्याने आग आटोक्यात आणेपर्यंत अवजड वाहतुकीचे वाहन खाक होऊन वाहतूकीची मोठा फज्जा उडल्याचे पाहिला मिळाले आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी हजर झाले असून महामार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले मात्र आग विझविण्यासाठी सामुग्रीच उपलब्ध नसल्याने या अग्निकांडामुळे पुणे सोलापूर हायवे वरती पुण्याला जाणाऱ्या वाहनांची किमान पाच किलोमीटर अंतरावर रांगा लागून प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
अपघातांना कारणीभूत कोन ?
पुणे -सोलापूर महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान चा महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला आहे. या महामार्गावरील मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याची आवस्था असल्याने वाहने खड्डांना हुकविण्याच्या प्रयत्नात अपघात ग्रस्त होत आहे. महामार्गावरील तुटकी सिग्नल व्यवस्था, रिफ्लेक्टर अभाव, साईडपटट्या, साईड कटींग बॅरीअर आदी समस्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. परंतु या संपूर्ण अवस्थेकडे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या एनएचआयकडे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.