धक्कादायक! दोन वर्षांच्या मुलीचे तीन तुकडे करून निर्घृण हत्या; १४ दिवसांनी सापडला मृतदेह

झारखंड : एका दोन वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे केल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातल्या तोपचांची पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या एका गावातुन समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही मुलगी १४ दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीपासून हि मुलगी बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते; पण ती सापडत नव्हती.राजगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या महतोतंडमधल्या बरदार जोरिया इथे एका मुलीचा मृतदेह छिन्नविच्छिन्नावस्थेत पडल्याची माहिती एका व्यक्तीनं दिली होती. या ठिकाणी झुडपात एका दगडाला शेंदूर, जानवं, तांदूळ सापडले. तसेच त्या ठिकाणी मातीचं एक भांडंदेखील होतं. मृतदेहाजवळ हे मातीचं भांडं फोडलेलं होतं.
हत्येपूर्वी मुलीचं केशवपन करण्यात आलं होते. जादूटोण्याच्या कारणावरून मुलीचा बळी दिला गेला आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शनिवारी एका पारंपरिक प्रार्थनास्थळी मृतदेहाचे तुकडे सापडल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह एका लहान मुलीचा होता. हत्येचं प्रकरण उघडकीस आल्याने ग्रामस्थ आणि मुलीचे नातेवाईक संतप्त आहेत.
घटनास्थळी पोलीस दाखल होताच त्यांनी पोलिसांसमोर निर्दशनं केली. हत्येची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. ज्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह सापडला ते देवान थान नावाचं पारंपरिक प्रार्थनास्थळ आहे.
दरम्यान, या मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.