ऑनलाइन मोबाईल ठरलं कारण! बारामतीत मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या तिघांना डंपरने चिरडले, सैन्यात भरती झालेल्या आणि लग्न ठरलेल्या दोन मित्रांचा मृत्यू…


बारामती : बारामतीमध्ये एक दुःखद बातमी समोर आली आहे. शहरातील विद्यानगरी चौक काल कर्जत तालुक्यातील दुधवडी गावातील दोघा मित्रांचा काळ ठरला. दुचाकी वर चाललेल्या तिघांना डंपरने चिरडल्याने दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतीक विजय भोसले (वय २०) व निखिल सौताडे (वय २०), ( दोघेही रा. दुधवडी, ता. कर्जत या दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला. त्यांचा तिसरा मित्र संदेश कुंभार हा सुदैवाने बचावला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, निखिल सौताडे हा युवक भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. निखिलने ऑनलाईन मोबाईल मागवला होता. हा मोबाईल घेण्यासाठी वरील तिघे मित्र मोटर सायकल वरून मोबाईल घेण्यासाठी निघाले होते.

दरम्यान, बारामती शहराच्या बाजूकडून आरटीओ कार्यालयाकडे जात असणाऱ्या डंपरच्या समोर या युवकांची दुचाकी आल्याने हा दुर्दैवी अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

अपघातात मृत्यू झालेला प्रतीक विजय भोसले हा युवक येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. हे तिघे ही एकाच रूमवर वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये प्रतीक व निखिल यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्यामुळे त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.

दोन्ही युवकांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात मृत्यू झालेला निखिल हा त्याच्या आईला बारामतीत दवाखान्यात घेऊन आला होता व उद्या ते पुन्हा गावी परत जाणार होते. त्याचे नुकतेच लग्न ठरलेले होते, अशीही माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर अपघातातून बचावलेल्या संदेश कुंभार याला देखील कमालीचा मानसिक धक्का बसला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!