आगामी निवडणुकीत शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना डच्चू? १४ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

Lok Sabha Election : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकूच्या तारखा जाहीर केल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीत शिंदे गटातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

भावना गवळी, कृपालजी तुमाणे आणि खासदार संजय मंडलिक यांना डावलण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी इतरांना शिंदे गट देणार आहे. शिंदे गटाच्या १४ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर झाली आहे.
संभाव्य यादी

श्रीरंग बारणे
धैर्यशील माने
हेमंत पाटील
कृपालजी तुमाणे
श्रीकांत शिंदे
राहुल शेवाळे
संजय राठोड
सदाशिव लोखंडे
हेमंत गोडसे
राजेंद्र गावीत, पालघर ( गावीत हे भाजपमधुन आलेले उमेदवार असल्याने ही जागा भाजपाला जाईल किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असतील)
प्रतापराव जाधव
संजय मंडलिक
Views:
[jp_post_view]