पुण्यात तीन महिन्याच्या बाळाने अंगठी गिळली, आणि…

पुणे : पुण्यात तीन महिन्याच्या बाळाच्या पोटात सोन्याची अंगठी गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कुटुंबाची एकच पळापळ उडाली. असे असताना बाळाला तातडीने भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
यावेळी बाळाचे वय आणि प्रकृती याचा विचार करून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टाळून एन्डोस्कोपीद्वारे अंगठी बाहेर काढली. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?, पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या राजकीय जीवनात..
या बाळाचा एक्स-रे काढल्यावर ही अंगठी बाळाच्या जठरामध्ये असल्याचे दिसले. बाळाचे वय पाहता शस्त्रक्रिया टाळून एन्डोस्कोपीद्वारा ही अंगठी काढता येईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र बाळ लहान असल्याने हे काम सोप्पे नव्हते.
नंतर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दादासाहेब मैंदाड यांना रुग्णालयात बोलवण्यात आले. दरम्यान, बाळाला आईने नुकतेच दूध पाजल्याचे एन्डोस्कोपी थिएटरमध्ये नेल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे बाळाच्या जठरातील अंगठी काढता येणार नव्हती.
यामुळे रात्री एकनंतर एन्डोस्कोपीद्वारा ही अंगठी काढण्यात आली. धनकवडीमध्ये ही घटना घडली होती. तीन महिन्याच्या बाळाला भूल देताना विशेष काळजी घ्यावी लागते. ही जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ. नेहा टिळक यांनी यशस्वीपणे पार पाडली.
यासाठी अतिदक्षता विभागात डॉक्टरांची टीमही तयार ठेवण्यात आली होती. आता बाळ सुखरूप असून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.